Friday, 15 February 2008

पेट्रोल दोन रुपयाने तर
डिझेल एक रुपयाने महाग

नवी दिल्ली, दि. १४ - गेले अनेक दिवस ज्याची चर्चा केली जात होती, ती इंधन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येत असून, त्यानुसार पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपये तर डिझेल एक रुपयाने महागले आहे.
या दरवाढीमुळे चालू आर्थिक वर्षात पेट्रोल कंपन्यांना ८४० कोटी रुपये जादा मिळू शकतील. इंधनाचे दर न वाढविण्यासाठी सरकारने आटोकाट प्रयत्न केले पण सार्वजनिक क्षेत्रातील तेल तेल कंपन्यांना होणारी ७२,००० कोटी रुपयांची हानी रोखणे आवश्यक होते, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी येथे दिली. पेट्रोलवरील दरात दोन रुपये वाढ करण्यात आल्याने कंपन्यांना महिन्याला १८० कोटी रुपये मिळतील तर डिझेलवरील एक रुपया वाढीने ३६० कोटी रुपये कंपन्यांना मिळणार आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कंपन्यांना होणारी एकंदरित हानी ७१,८०८ कोटी रुपये आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा