Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 July, 2011

कोकण रेल्वे अद्याप ठप्पच

सावंतवाडी, दि. २१ (प्रतिनिधी)
कुडाळ ते सिंधुदुर्ग नगरी दरम्यानच्या तळगाव (ता. मालवण) येथील कोकण रेल्वेच्या रुळावर ब्लास्टींग दरड कोसळल्याने आज गोव्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी सव्वातीन वाजता सावंतवाडी रेल्वेस्थानकात आलेली ओखा एक्सप्रेस रात्री ९ वाजेपर्यंत तिथेच अडकून पडली होती.
पोमेंडी रत्नागिरी येथील दरड हटवण्याचे काम आज दुपारी पूर्ण झाले असले तरी तळगाव येथील दरडीने रेल्वेमार्गावरील वाहतूक खोळंबून राहिली. तळगाव येथील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दुपारी पोमेंडी येथील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे कोकण रेल्वे आता ‘रुळावर’ येईल अशी अपेक्षा होती. मात्र तळगावला दरड कोसळल्याने मुंबई-गोवा रेल्वेमार्ग बंद झाला. दरम्यान, रेल्वेसेवा रत्नागिरीपर्यंत सुरळीत असून पुढील मार्ग बंद आहे. पहाटेपूर्वी दरड हटवल्यास रेल्वेमार्ग सुरळीत होईल अशी शक्यता कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल तीन तास उशिरा सोडण्यात येणार असून ती मडगावहून सावंतवाडीपर्यंत जाईल व पुढे मार्ग सुरळीत झाल्यास पुढे मार्गस्थ होईल. अन्यथा मार्ग सुरळीत होईपर्यंत सावंतवाडी स्थानकातच थांबेल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

No comments: